Tuesday, 3 September 2019

महाराष्ट्रातील सण गौरी पूजा

आपल्या महाराष्ट्राचा एक मोठा आणि खास सण .थोडीशी माहिती गौरी पूजेची माझ्यापरीने. कुठे काही चुकले तर क्षमा करा व तुम्हाला काही माहिती असेल तरी   हि सुचवा.




गौरीपूजन हा महाराष्ट्रातील सण आहे. यास महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. भाद्रपद  महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरी  बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात.
गौरींच्या मांडणीची  पद्धती:
             गौरींच्या पूजेंची पद्धत आणि परंपरा बदलल्या आहेत. काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात, काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. काही घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ ,ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्र्याच्या, लोखंडी सळयांच्या  कोथळ्या मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात. सुपात धान्याची रास ठेऊन त्यावर मुखवटा ठेवतात.किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात.आधुनिक काळात गौरीपूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते. आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांची आणि लक्ष्मींच्या हातांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात. या गौरी/महालक्ष्मी किंवा सखी-पार्वतींसह त्यांची मुलेही  मांडतात.कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजतात, कोणी मातीची बनवितात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात.तसेच घरातील रूढी परमपरेनुसार गौरी ची थापना करतात . 

गौरी आवाहन (पहिल्या दिवशी ):
         आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत आणताना, जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात . घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणतात. त्यावेळी ताट चमच्याने किंवा घंटेने वाजवत आवाज केला जातो. यानंतर   त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करतात,नंतर गौरी जिथे बसवायची आहे तिथे मकर उभारतात आणि  त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवितातपहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी-भाकरीचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत काही भागात  महाराष्ट्रात आहे.



                        
गौरीपूजन (दुसऱ्या  दिवशी ):

    दुसर्‍या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा केली जाते. सकाळी गौरींची/महालक्ष्मीची पूजा-आरती करून केलेल्या फराळाचा (रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू) नैवेद्य दाखवतात.तसेच धान्यांच्या राशी टाकल्या जातात (गहू,ज्वारी ,मूग,तांदूळ ,) राशी टाकल्यांनंतर घरातील संपूर्ण खर्चिक व्यवहार केले जात नाही ते  तिसऱ्या दिवशीच्या गाठी पडून पूजा आरती नैवद्य दाखवे पर्यंत केले जात नाही .  आणि मखराच्या मंध्यभागी फुलोरा (अनारसा ,कारंजी,पापडी,कणकेपासून बनवलेली वेंनी  इ. )  लटकवतात . (बऱ्याच ठिकाणी पूजा करण्या अगोदर  दोन्ही गौरींना  १६ वेड घालून  ऐकत्र सुतावतात.  )नंतर संध्याकाळी आरती करतात. (बऱ्याच ठिकाणी कुटुंबातील  पद्धती प्रमाने १६ ,१६ दोन्ही  गौरींची आणि पिल्लांची ८,८ अशी कांणकेची दिवे करून त्याची आरती केली जाते) .  पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी. केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात.आरती झाल्यांनंतर सर्वत्र प्रसन्नता पसरलेली असते .



विसर्जन (तिसऱ्या दिवशी ): 

     गौरीच्या नैव द्यांतील बनवण्यात आलेल्या पदार्थ आणि जेवण झालेले  हात बाहेर न धुता ऐका  ठिकाणी धुवून ते पाणी  छोटा   करून त्यात सर्व उष्टावळ तसेच इत्यादि टाकले जाते .  दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे/महालक्ष्मींचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी पोवत्याच्या/सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात. यांमध्ये हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरींची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात.  सायंकाळी महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम केला जातो. दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धती प्रचलित आहे.या तिसऱ्या दिवशी गौरींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते. गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो, आणि त्यांचे विसर्जन केले जाते.(धातूच्या किंवा कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत.) गौरी ची थापना केल्यावर कलशातील तीर्थ सर्वत्र घरामध्ये व शेतात शिंपडले जाते आणि  ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर टाकतात. त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडुपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे.




21 comments:

  1. This Festival is a very well & Thought fully
    So they are the good

    ReplyDelete
  2. खुपचं छान ...माहिती
    keep it up .... 👌👌👍

    ReplyDelete
  3. खूप छान माहिती

    ReplyDelete
  4. खूप छान माहिती

    ReplyDelete
  5. खुप छान माहिती दिली आहे

    ReplyDelete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

गणपती बाप्पा मोरया

"गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या "......                                           नवसाला पावतो हाकेला धावतो असा...